India Alliance Latest News Saamtv
महाराष्ट्र

Raigad lok Sabha : रायगडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचे जावई अजित पवार गटात प्रवेश करणार

raigad lok sabha constituency : रायगडमध्येही लोकसभा निवडणुकीची राजकीय धामधूम पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम, रायगड

रायगड : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. रायगडमध्येही लोकसभा निवडणुकीची राजकीय धामधूम पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे जावई, काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले हे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदारसंघात तटकरे यांनी इंडिया आघाडीला दे धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. माजी आमदार मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी आहेत.

मुश्ताक अंतुले हे २३ किंवा २४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाला अंतुले यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे. मुश्ताक अंतुले हे माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे जावई आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुश्ताक अंतुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुश्ताक अंतुले यांच्या प्रवेशामुळे सुनील तटकरे यांना मोठी ताकद मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मोबाईल मार्केटला झटका! युद्धामुळे 25 हजार कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT