Sharad Pawar: १० वर्ष सत्तेत होता; तुम्ही काय केलं? शरद पवारांचा अमित शहांवर पलटवार

Maharashtra Loksabha Election 2024: निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार कालपासून नगरमध्ये मुक्कामी आहेत. आज सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. २० एप्रिल २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत. नगरमध्ये निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार कालपासून मुक्कामी आहेत. आज सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले शरद पवार?

"महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) वाटाघाटी करून आम्ही लोकसभेच्या दहा जागा लढवत आहे. विधानसभेत अधिक जागा लढवणार आहोत. मागील वेळी चार जागा होत्या या वेळी वाढ झाल्याचे दिसेल. तसेच भाजपचा चारशे पारचा नारा चुकीचा वाटतो. कारण या निवडणुकीत एवढ्या जागा येणार नाहीत," असे शरद पवार यावेळी म्हणाले.

अमित शहांवर पलटवार!

यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार पलटवार केला. २०१४ ते २०२४ पर्यंत सत्तेत होते. ते मला जाब विचारतात. मग दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही काय केलं हे सांगायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही काय केलं हे जगाला माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Sharad Pawar
School News : उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना गैरहजर राहण्याची सवलत; राज्य सरकारचे सर्व शाळांना निर्देश

लोकसभेच्या अधिक जागा जिंकू...

"धनगर आरक्षणबाबत आम्ही बैठक घेत होतो. मात्र भाजपने अनेक वेळा आश्वासन दिले मात्र आरक्षण दिले नाही. त्यांना कुठेच न्याय मिळत नाही. फडणवीसांनी अनेक वेळा धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते. असेही शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच यावेळी महाविकास आघाडी लोकसभेच्या ५० टक्के जागा जिंकेल," असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar
Baramati Constituency: उत्तम जानकरांचे अजित पवारांना खुलं आव्हान, राष्ट्रवादी काय उत्तर देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com