Saam Tv
चेहरा डल आणि थकलेला दिसतोय? महागडी स्किनकेअर प्रोडक्ट्स घेण्यापेक्षा रोजच्या स्किनकेअर रूटीन मध्ये या छोट्या सवयींचा समावेश करा.
सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर साचलेले तेल, मैल, घाम काढण्यासाठी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.
अॅलोवेरा जेल लावल्याने चेहरा फ्रेश आणि निरोगी राहतो. ताजे अॅलोवेरा जेल चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा दिवसभर हायड्रेटेड आणि स्मूथ राहिल.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉश्चराईझर लावायला विसरू नका. यामुळे त्वचा अधिक हायड्रेटेड आणि हेल्दी राहते.
बाहेर पडताना सनस्क्रिनचा वापर करा. चेहरा, मान आणि उघड्या त्वचेवर सनस्क्रिन लावायला विसरू नका. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होते.
तुम्ही वापरत असलेला फेसपॅक आठवड्यातून ३ वेळा चेहऱ्याला लावा. त्यामुळे चेहऱ्यावर मस्त ग्लो येईल.
दिवसभरात सतत चेहऱ्याला हात लावणे टाळा. अस्वच्छ हात चेहऱ्याला लावल्याने पिंपल्स, खाज चेहऱ्याला येत राहते.
शरीराल आवश्यक असेल तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा कायम हायड्रेटेड राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.