Saam Tv
कॉलेज किंवा ऑफिसच्या बॅगा दिवसभर आपल्यासोबत इकडे तिकडे फिरत असतात. त्यामुळे त्यात बॅगमध्ये धूळ, कागदाचे तुकडे असा कचरा साचतो. याशिवाय पडलेल पाणी, सांडलेल्या अन्नामुळे बॅगमधून विचित्र असा घाणेरडा वास मारतो.
आपल्या आवडत्या असा घाण वास मारलेला कोणालाच आवडत नाहीत. त्यामुळे काही सोप्या टिप्सने तु्म्ही हा वास कायमचा घालवू शकता
बॅग स्वच्छ करण्यापूर्वी प्रत्येक कप्पा, धूळ,बिस्किटांचे कण आणि इतर कचरा पूर्णपणे साफ करा.बॅग झटका.
बॅग अनेकदा फरशीवर, ड्रॉव्हरमध्ये ठेवली जाते. त्यामुळे बॅगेच्या तळाचा भाग जास्त मळलेला असतो. त्या भागाची स्वच्छता पहिली करा.
बॅगेचा कपडा हलका असतो त्यामुळे जास्त घासू नका. बॅगेचा आतला भाग हलक्या हाताने चोळा. कडक उन्हात सुकवा. यामुळे वास कायमचा निघून जाईल.
डब्बा खाऊन झाल्यावर तो स्वच्छ धुवूनच बॅगेत ठेवा. त्यातील अन्न सांडते आणि कुजते. त्यामुळे बॅगेत स्वच्छ डब्बा करून ठेवा.
वापरलेले टिश्यू किंवा घाण रूमाल बॅगेत तसेच ठेवू नका. बॅगेला कचरापेटी समजणे बंद कराल तेव्हाच बॅग स्वच्छ राहिल.
रोज शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला वापरली जाणारी बॅग साधारण १ ते २ आठवड्यांनी स्वच्छ करायला हवी.