Saam Tv
मळलेल्या पीठात पाणी आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण असते. त्यामुळे चांगले साठवले नाही तर बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.
खराब झालेले पीठ खाल्ल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
पीठ जास्त वेळ ठेवल गेल असेल तर ते आंबण्याची शक्यता असते. त्यामुळे चव, रंग बदलू शकतो. असे पीठ खाल्ल्याने पचनाच्या समस्या, गॅस, ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो.
केव्हा केव्हा हवा आणि ऑक्सिजनच्या संपर्कामुळे पिठाचा रंग बदलू शकतो. मात्र रंगाबरोबरच वास किंवा बुरशीसारखा बदल दिसत असेल तर ते पीठ आरोग्याला धोकादायक असू शकतो.
पीठाला विचित्र असा आंबट किंवा कुबट वास येत असेल तर सावध व्हा. पिठावर बुरशीजन्य किंवा संशयास्पद आढळल्यास त्या पीठाच्या चपात्या खाणे टाळावे.
पीठ उघड्या भांड्यात ठेवू नका. स्वच्छ हवाबंद डब्यात ठेवणे. त्यामुळे पीठ सुकणे किंवा इतर पदार्थांचा वास पीठाला लागणे यामुळे पीठ खराब होण्याचा धोका कमी होतो.
शक्य असल्यास रोज ताजे पीठ मळून वापरणे योग्य आहे. मात्र पीठ आधीच मळून ठेवत असल्यास हवाबंद डब्यात साठवणे योग्य आहे.
रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणे पुर्णपणे चुकीचे नाही. मात्र पीठ स्वच्छ, हवाबंद डब्यात ठेवणे आणि शक्यतो २४ तासांच्या आत वापरणे महत्त्वाचे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.