Forest Guard Swati Agham, Yavatmal संजय राठोड
महाराष्ट्र

जंगलातल्या लेडी सिंघमचं पक्षीप्रेम; पक्ष्यांच्या पोटाची खळगी भरतेय वन विभागाची वाघीण

Swati Agham Latest News : घनदाट जंगलात अंगावर वनविभागाची खाकी वर्दी चढवून लाकूड तोडणाऱ्यासह अन्य चोरट्यांना घाम फोडणारी वनरक्षक म्हणून स्वाती अघम यांची जिल्ह्यात चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशात जंगलात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पशु-पक्ष्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःच्या पदरातील पैसा खर्च करून वन्यजीव पशु-पक्षी, प्राणी आणि तक्षम वन्य जीवांची पोटाची खळगी भरण्यासाठी ऑन ड्यूटी झटणारी वन वाघीण सावळी वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा येथील बीटच्या वनरक्षक (Forester) चर्चेचा विषय बनली आहे. या वन विभागातील वाघीणीचे नाव स्वाती अघम (Swati Agham) असे आहे. अंत्यत घनदाट जंगलात अंगावर वनविभागाची खाकी वर्दी चढवून लाकूड तोडणाऱ्यासह अन्य चोरट्यांना घाम फोडणारी वनरक्षक म्हणून स्वाती अघम यांची जिल्ह्यात चर्चा आहे. (Forest Guard Swati Nigam is doing help to birds in yavatmal jungles)

हे देखील पाहा -

सावळी वनक्षेत्रात वन रक्षक पदावर काम करणाऱ्या स्वाती अघम यांचे पक्षी प्रेम सध्या जिल्ह्यात (Yavatmal) चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य कुटुंबातील स्वाती अघम ह्या २०११ मध्ये वन विभागात वनरक्षक म्हणून नोकरीला लागल्या. सध्या स्वाती अघम ह्या सावळी वन परिक्षेत्रात कार्यरत आहेत. येथे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या क्षेत्रात पशु-पक्षांना पिण्यासाठी पाणी व चारा उपलब्ध करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जंगलात स्वतःच्या खर्चाने पक्षांसाठी पाण्याचे भांडे व धान्य त्या नियमित ठेवतात, त्यामुळे पक्षांच्या किलबिलाट येथे पहायला मिळतो. घनदाट जंगलात कुठल्याही भीतीशिवाय त्या वनरक्षण तर करतातच पण सोबत पक्षांच्या प्रेमातून मानवतेचा आगळावेगळा संदेश देखील देत असल्याने वृक्षांसोबत पक्षांवर जीव लावणारी अनोखी स्वाती अघम नावाची वाघीण चर्चेचा विषय बनली आहे.

वनरक्षक स्वाती अशोक अघम ह्या २०११ मध्ये वन विभागात नोकरी वर लागल्या. नेर, यवतमाळ असा प्रवास केल्यानंतर आता सावळी वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा बीट मध्ये कार्यरत आहेत. कुऱ्हा बीटमधील मांगूळ जंगलातील पर्यटनस्थळी व जंगल परिसरात त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पशु-पक्षांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करून जंगलातील होणाऱ्या लाकडांच्या चोरीवर आळा बसवलाय. या वन विभागातील वाघीण स्वाती अघम यांनी लाकूड चोरट्यांचा बंदोबस्त केल्याने जंगलतील मौल्यवान वृक्षतोड थांबली आहे. शेकडो हेक्टरवर वनरक्षक स्वाती अघम या अभिनव उपक्रम राबवित असल्याने सध्या जिल्ह्यात त्याच्या उपक्रमाची चर्चा होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT