Tadoba Andhari Tiger Reserve, Tourists
Tadoba Andhari Tiger Reserve, Tourists saam tv
महाराष्ट्र

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात धागडधिंगा घालणा-यांना वनखात्याने ठाेठावला दहा हजारांचा दंड

संजय तुमराम

Tadoba Jungle : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या (tadoba tiger reserve) बफर क्षेत्रात मोठमोठ्याने गाणे वाजवून, वाहनाखाली उतरून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना पाच हजार रुपयांचा दंड (fine) ठाेठावण्यात आला आहे. त्याशिवाय पर्यटकांना (tourists) बफर क्षेत्रातून बाहेर काढले.

गणराज्य दिनानिमित्त मिळालेल्या सुटीत ताडोबा मार्गावर बफर क्षेत्रात घुसलेल्या पर्यटकांनी भर जंगलात गाडीखाली उतरून वाहनातील रेकॉर्ड जोराने वाजवत धिंगाणा सुरू केला. पार्टीच्या मूडमध्ये आलेले हे पर्यटक घनदाट जंगलात गाडीखाली उतरले आणि गाण्यावर डान्स करीत होते.

ज्या ठिकाणी या पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता. त्या भागात वाघाचे वास्तव्य असून अनेकदा रस्ता ओलांडताना पर्यटकांनी बघितले आहे. अशा संवेदनशील ठिकाणी या पर्यटकांनी नियमभंग करीत धिंगाणा केला. हे दृश्य तिथून जाणाऱ्या एका वनपालाने बघितले आणि परिक्षेत्राधिकाऱ्याला माहिती दिली.

त्यावरून वनपथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनासह पर्यटकांना कार्यालयात नेऊन त्यांच्यावर पाच हजारांचा दंड ठोकला. शिवाय त्यांना लगेच बफर क्षेत्राबाहेर पाठवण्यात आले. हे पर्यटक परराज्यातील असल्याने नियमांची (rules) त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे दंड ठोकून त्यांना समज देऊन सोडण्यात आले अशी माहिती संतोष थिपे, परिक्षेत्राधिकारी, मोहर्ली यांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शक्तीप्रदर्शन

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

SCROLL FOR NEXT