kokan news, wood truck, ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Kokan News : काेकणात 'Pushpa' स्टाईल चाेरी, लाकडांसह दाेन ट्रक जप्त; राजकीय वर्तुळात खळबळ

या ट्रकचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Ratnagiri News : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) येथे वन विभागाकडून (Forest Department) मोठी कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर रित्या जंगलतोड करून ट्रकमध्ये भरलेली लाकडे मुंबईच्या (mumbai) दिशेने घेऊन जात असताना वन विभागाने पकडले आहे.

वन विभागाला (forest department) काही स्थानिक नागरिकांनी ट्रकबाबत माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने खेड येथील भरणे नाका या ठिकाणी छापा टाकला. तेथे त्यांना दोन ट्रक मध्ये जंगली लाकडे भरलेली आढळली. वन विभागाच्या अधिका-यांनी चाैकशी केली असता संबंधितांकडे वन विभागाचा परवाना नव्हता. (Maharashtra News)

त्यानंतर दोन्ही ट्रक वन विभागाने ताब्यात घेतले. या ट्रकचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान ट्रकचा मालक राजकीय वर्तुळातील असल्याची प्राथमिक समाेर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक ठिकाणी बेकायदेशीर जंगलतोड (jungle) सुरू असून डोंगर उजाड होत चाललेले पाहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीतून मोटार काढताना विपरीत घडलं; शॉक लागून बाप लेकासह चौघांचा मृत्यू, धाराशिवात हळहळ

Hair Care: केमिकल्सचे प्रॉडक्टने केस खराब झालेत? आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरायला, केस होतील नॅचरली सॉफ्ट

Glowing Skin Tips: पार्लरला जायची गरज नाही! देसी नुसका वापरा अन् चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो मिळवा

Baramati : १० हजारांचा हप्ता दिला नाही; गावगुंडांकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

Eyebrow Growth: पातळ आयब्रोमुळे चेहऱ्याची शाईन गेलेय? या २ उपायांनी होईल चमत्कार, तुम्हीच दिसाल उठून

SCROLL FOR NEXT