घोरपडीची शिकार करणाऱ्या 2 जणांना वन विभागाने घेतले ताब्यात अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

घोरपडीची शिकार करणाऱ्या 2 जणांना वन विभागाने घेतले ताब्यात

पाळीव कुत्र्यांच्या सहाय्याने घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी धाड मारून 2 इसमांना ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत घोरमारे

भंडारा - वन्य प्राण्यांची शिकार करण्यास प्रतिबंध असला तरी वन व्याप्त परिसरात तृणभक्षी प्राण्यांची शिकार करून मांस विक्रीचा गोरखधंदा केला जात असल्याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्याच्या लाखनी वन परिक्षेत्रातील सोनेखारी शेतशिवारात आला आहे. Forest Department arrests two Monitor hunters

पाळीव कुत्र्यांच्या सहाय्याने घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी धाड मारून 2 इसमांना ताब्यात घेतले आहे. सुरज मनिराम मडावी व सुधीर किशोर दरवडे रा. दैतमांगली अशी आरोपींची नावे असून आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

भंडारा जिल्ह्यातील सहवन क्षेत्र लाखनी येथील वनरक्षक बिटात घनदाट अरण्य असल्यामुळे हिंस्त्र श्वापदांसह तृणभक्षी प्राण्यांचाही अधिवास आहे. पण मनुष्यबळाअभावी योग्य रीतीने वनसंरक्षण होत नसल्याचा फायदा शिकारी टोळीने उचलला आहे. दरम्यान घोरपडीची शिकार केल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली त्याआधारे कारवाई करत वनविभागाने घटनास्थळावरून 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन घोरपडीचे मांस जप्त केले आहे.

या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक देखील करण्यात आला आहे. वन विभागाच्या वतीने आरोपींना प्रथम श्रेणी दंडाधिकारी लाखनी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वनविभाग करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT