FDA Big Action in Sambhajinagar SaamTv
महाराष्ट्र

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

FDA Big Action in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएने मोठी कारवाई केली. सिद्धेश्वर दूध डेअरीवर छापा टाकत ३५०० लिटर दूध पावडर जप्त केली.

Priya More
  • संभाजीनगरमध्ये एफडीएची मोठी कारवाई

  • सिद्धेश्वर डेअरीवर धाड टाकत मोठा दूध साठा जप्त केला

  • ३५०० लिटर दूध पावडर जप्त

माधव सावरगावे, संभाजीनगर

संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएने धडक कारवाई केली. तब्बल ३५०० लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करण्यात आली. १ लाख ३२ हजार रुपयांचे संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. या कारवाईनंतर सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळे ठोकण्यात आले. हे दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी आणि गुजरातमधील पंचमहल दूध संघाला पुरवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. करणी फुलंब्री पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मराठवाड्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईत आता दूध व्यवसायातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएने टाकलेल्या धाडीत तब्बल ३ हजार ५०० लिटर संशयित दूध आणि त्यात मिसळण्यासाठी आणलेली गोवर्धन दूध पावडर जप्त करण्यात आली. सुमारे १ लाख ३२ हजार किमतीचे हे दूध जागेवरच नष्ट करण्यात आले.

तपासात हे दूध फुलंब्रीतील शिवकृपा दूध डेअरीला पुरवले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर शिवकृपा डेअरीवरही एफडीएने कारवाई केली असता तेथेही गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळे ठोकण्यात आले आहे. याचबरोबर, शिवकृपा डेअरीमधून हे दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी (केअर ऑफ एम/एस. सोनाई डेअरी, इंदापूर) तसेच गुजरातमधील पंचमहल दूध उत्पादक सहकारी संघ यांना पुरवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई सह आयुक्त एस आर करकले, सहायक आयुक्त दयानंद पाटील यांचे मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, प्रज्ञा सुरसे यांनी पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

Tamilnadu Government: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी, 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

Karna Mahabharata: महाभारतात कर्णाला कोणकोणते शाप मिळाले होते?

तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT