सांगलीला पुराचा फटका धरणामुळे नव्हे तर रस्त्यामुळे बसणार..!  विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीला पुराचा फटका धरणामुळे नव्हे तर रस्त्यामुळे बसणार..! 

सांगली नजीक निर्माण होणाऱ्या रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

सांगली - सांगली Sanglli नजीकच्या पाच गावांसह शहराला City आता महापूराबाबत Flood एका नव्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. आता पर्यंत अलमट्टी Almatti धरणामुळेc Dam पुराचा फटका सांगली शहराला बसत होता. मात्र, आता सांगली नजीक निर्माण होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. जवळपास चार किलोमीटर पर्यंत रस्त्याची उंची सात फुटांपासून 13 फुटांपर्यंत करण्यात आल्याने याचा परिणाम पूर आल्यास होणार आहे. Flood will hit Sangli not because of the dam but because of the road ..!

हे देखील पहा -

सांगली शहराला आणि त्याच्या नजीक असणाऱ्या गावांना महापूर आल्यानंतर अलमट्टी धरणामुळे फटका आतापर्यंत बसल्याचं आपण पाहिलं आहे. 2019 नंतर वारंवार महापुराचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी बैठक घेऊन अलमट्टी धरणातून पावसाळ्यात योग्य विसर्ग ठेवण्याबाबत विनंती केली आहे. एका बाजूला राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटर चा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत असताना, दुसऱ्या बाजूला सांगली शहराला मात्र आता एका नव्या बॅक वॉटरच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे Highway हा धोका निर्माण झाला आहे.व सांगली शहराच्या नजीक असणाऱ्या अंकली ते मिरज दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याची उंची ही जवळपास 7 ते 13 फुटांनी पर्यंत वाढवण्यात आली आहे. रस्त्यासाठी एक प्रकारे हा घालण्यात आलेला बांध यामुळे कृष्णा Krishna आणि वारणा Warna नदीच्या River पात्रात बाहेर पडणारे पाणी या ठिकाणी बसणार आहे आणि ते पुन्हा सांगली शहराच्या विस्तीर्ण अशा भागात पसरणार आहे. या रस्त्यामुळे बॅकवॉटरचा Backwater एक मोठा धोका भविष्यासाठी निर्माण झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून या विरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT