लातूर - नांदेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यातील दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ अवैद्य मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून चाकूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हणमंत आरदवाड, ईश्वर स्वामी, हणमंत मस्के व इतर पोलीसांनी या दोन ट्रकची तपासणी केली. Action on trucks carrying illegal ration grains; Rice worth Rs 12 lakh seized
हे देखील पहा -
त्यावेळी त्यामध्ये तांदुळ आढळून आला. याबाबत चालकास याबाबत विचारणा केली असता हा ट्रक कर्नाटक राज्यातून तांदुळ घेऊन गोंदीया येथे जात असल्याचे त्याने सांगितले. परंतू ट्रकचे वजन उमरगा चौरस्ता येथे करण्यात आल्याचे दिसून आले. चालक देत असलेली माहिती व कागदपत्र यात तफावत असून तांदुळ स्वस्त धान्य दुकानाला पुरवठा केला जाणार असल्याचा संशय आल्यामुळे पोलीसांनी दोन्ही ट्रक पोलीस ठाण्यात आणले.
ट्रकचे चालक बीरागोंडा ईश्वर हुगुंडा (वय ३०) व अहमद अमिर पटेल (वय २५) रा. दोघें वडनखेरा ता. हुमनाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचे पत्र पोलीसांनी तहसीलदारांना दिल्यावरून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बालाजी चितळे यांनी ट्रक मधील तांदळाची पाहणी केली व त्याचे नमुने घेतले आहेत. सदरील तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार असून त्यांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.