beed , dengue  saam tv
महाराष्ट्र

Beed News : पिंपरखेडला पाच वर्षाच्या मुलीचा डेंग्यूनं मृत्यू

आरोग्य विभागासह ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाने स्वच्छतेवर लक्ष देण्याची गरज.

विनोद जिरे

Dengue : बीड जिल्ह्यातील वडवणी शहरासह तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. प्रत्येक गावागावात रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये लहान मुलांची (kids) सर्वाधिक संख्या आहे. वडवणीच्या पिंपरखेड गावातील पाच वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूने (dengue) उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेदिका भगवान साबळे असं मृत चिमुकलीचे नाव आहे. (Breaking Marathi News)

पिंपरखेड येथील शाम भगवान साबळे यांच्या वेदिका हिला दहा दिवसांपूर्वी आजाराने ग्रासले. त्यामुळे तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तपासणी अंती डेंग्यू आजाराने तिचा मृत्यू झाला. (beed latest marathi news)

दरम्यान वडवणी शहरासह तालुक्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारख्या संसर्ग आजाराने थैमान घातले आहे. याला आरोग्य विभागासह ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासन देखील जबाबदार आहे. गावात अस्वच्छता, रस्त्यावर पाण्याचे डबके, मच्छर सह आदी प्रश्नांनी ग्रासले असल्याने यातूनच डेंग्यू सारखे आजार फोफावले असल्याचे बोलले जात असल्याने आरोग्य प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde : "महाराज आजही रायगडावर..."; प्रविण तरडे यांनी पर्यटकांना हात जोडून केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात थंडी कायम

Mithila Palkar: कपसाँग गर्ल मिथिला पालकरचा नवा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

Ladki bahin Yojana eKYC: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटमध्ये बदल, या महिलांसाठी नवीन eKYC प्रोसेस, कशी असणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Badlapur Election : बदलापूर निवडणुकीत ‘नात्यागोत्यांचं’ कुटुंबराज! तब्बल १२ दाम्पत्य रिंगणात, एकाच घरातील ६जण उमेदवार

SCROLL FOR NEXT