विषारी औषध टाकल्याने पाच टन माशांचा मृत्यू... Saam Tv
महाराष्ट्र

विषारी औषध टाकल्याने पाच टन माशांचा मृत्यू...

बाजारभावाप्रमाणे पाच लाखांचे नुकसान

मंगेश कचरे

बारामती - पुणे Pune जिल्ह्यातील इंदापूर Indapur तालुक्यातील भिमा नदीकाठच्या Bhima River पळसदेव- शेलारपट्टा परिसरातील अशोक सुखदेव केवटे यांच्या शेततळ्यातील मासे Fish मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रूपचंद जातीचे हे मासे अज्ञाताने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा संशय असून याबाबद इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत केवटे यांनी माहिती दिली की, शेलारपट्टा परिसरातील आमच्या दोनशे बाय शंभर लांबी-रुंदीच्या शेततळ्यामध्ये आम्ही आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे सुमारे तीस हजार बीज सोडले होते. सध्या या माशांचे वजन अडीचशे ते सातशे ग्रॅम इतके झाले होते.

मात्र, रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञाताने पाण्यात विषारी औषध टाकल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. सकाळी माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या बाजारात हे मासे ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे आमचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT