Nanded accident news saam tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये ट्रक-टेम्पोचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, चार जखमी

नांदेड-किनवट महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड : येथे एक दुख:द घटना घडली आहे. नांदेड-किनवट महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडलीय. हा अपघात हिमायतनगर तालुक्यातील करंजी फाटा येथे रात्री आठच्या सुमारास झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना हिमायतनगरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Nanded accident latest news update)

अपघातात मृत आणि जखमी झालेले नागरिक मजूर कामगार असून ते हिमायत नगरमधील रहिवासी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या नावाची माहिती मिळाली नाहीय.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमायत नगर येथे राहणारे कामगार काम करून घरी जायला निघाले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला. नांदेड-किनवट महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाल्याने काळी वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा चक्काचूर झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या चौघांना हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT