five passed away in belgavhan ghat today, yavatmal accident news  saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Accident News : पोहरादेवीला निघालेल्या वाहनास बेलगव्हान घाटात अपघात; पाच ठार, 11 जखमी

या घटनेची माहिती कळताच आमदार नाईक यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News :

पोहरादेवी (poharadevi) येथे नवस फेडायला जाणाऱ्या वाहनाचा बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात पाच जण ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटातील लोकनायक बापूजी अणे स्मृती स्थळ नजीक मालवाहू वाहनाचा अपघात झाला. हा अपघात घडताच वाहनातील प्रवाशांच्या परिसरातील नागरिकांना किंचाळ्या कानावर पडल्या.

पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतक, जखमी हे पुसद तालुक्यातील मोहा तांडा , टोकि तांडा पांढुरणा सिंघनवाडी येथील आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि मदतीसाठी मेडिकेयर रुग्णालयात आमदार इंद्रनील नाईक (mla indraneel naik) आणि आमदार निलय नाईक (mla nilay naik) यांनी धाव घेतली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT