five members ineligible of revsa grampanchayat near amravati  saam tv
महाराष्ट्र

Amravati : ग्रामपंचायतीचा कर थकविला; 'रेवसा' चे 5 सदस्य अपात्र

या कारवाईमुळे गावातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

ग्रामपंचायतचा कर न भरल्यामूळे अमरावती जिल्ह्यातील रेवसा ग्रामपंचायतचे (revsa grampanchayat) पाच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. याबाबतचा आदेश अमरावती जिल्हा प्रशासनाने काढला आहे. हा आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी नुकताच पारित केला आहे. (Maharashtra News)

ग्रामपंचायतचा मालमत्ता कर, पाणीपट्टी कराचा बिल प्राप्त झाल्यानंतरही रेवसा ग्रामपंचायत मधील पाच सदस्यांनी कर भरला नाही. त्याबाबतची तक्रार अमरावती जिल्हा प्रशासनापर्यंत केली गेली. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली.

या सुनावणीनंतर अप्पर जिल्हाधिकारी यांनी पाच ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली. दरम्यान एकाच वेळी ग्रामपंचायतचे पाच सदस्य अपात्र ठरल्याने गावातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; चांदनी नदीला महापूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

Doctor Strike : पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम | VIDEO

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

SCROLL FOR NEXT