Reliance Jewels sangli, SP Basavraj Teli, Sangli News saam tv
महाराष्ट्र

Reliance Jewels दराेड्याप्रकरणी सहा जण पाेलिसांच्या ताब्यात

Reliance Jewels Robbery Case :

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यातील सहा संशयितांना हैदराबाद येथून पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती पोलिस उपाधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली. या सर्वांना लवकरच सांगली येथे आणले जाणार आहे.  (Maharashtra News)

रिलायन्स ज्वेल्समधील भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोडामधील चार संशयित दरोड्याखोरांचे रेखाचित्र सांगली पोलिसांकडून जारी करण्यात आले. या दरोड्यात 14 कोटींचे सोने-डायमंडची लूट करण्यात आली आहे. तसेच 67 हजार रुपये देखील लंपास करण्यात आले. आतापर्यंत दरोडेखोरांनी वापरलेली कार जप्त केली आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली.

आज या कारमधील वस्तूची कोल्हापूरच्या टीमकडून फॉरेनिसक लॅबकडून नमुने घेण्यात आले. याचबरोबर आज यातील चार संशयितांची रेखाचित्र पोलिसांकडून जाहीर करण्यात आली. या रेखा चित्रातील संशयतांची माहिती कोणास असेल तर पोलिसांची संपर्क साधावा त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असे आवाहनही पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे.

दरम्यान रिलायन्स दरोडा प्रकरणी सांगली पोलिसांनी हैदराबाद येथून सहा संशयित ताब्यात घेतले आहेत. लवकरच या संशयितांना सांगलीत आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT