पतीच्या दुसऱ्या शाही विवाह सोहळ्यात पहिल्या पत्नीचा राडा
पतीच्या दुसऱ्या शाही विवाह सोहळ्यात पहिल्या पत्नीचा राडा चेतन इंगळे
महाराष्ट्र

पतीच्या दुसऱ्या शाही विवाह सोहळ्यात पहिल्या पत्नीचा राडा

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई - वसईतल्या एका लग्न समारंभात  चित्रपटाला शोभेल असा प्रकार घडलेला पाहायला मिळाला. पतीच्या सुरू असलेल्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीने धाड घालून राडा घेतला व अंतिम टप्प्यात सुरू असलेले लग्न मोडले. वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉल मध्ये हा प्रकार घडला आहे. अर्जुन सिंग असे पतीचे नाव असून कांचन सिंग असे पहिल्या पत्नीचे नाव आहे. २०१२ मध्ये दोघांचा वैदीक पद्धतीने विवाह झाला होता. पतीने हवा तो हुंडाही घेतला, मात्र सहा महिन्यातच पतीने पत्नीला दूर केले. 

हे देखील पहा -

या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असताना काल रविवारी पती दुसरे लग्न करत असल्याचे पहिल्या पत्नीला समजले व तिने भर लग्न मंडपात येऊन राडा घातला. पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला व दुसरे लग्न होता होता थांबले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्ती करत वातावरण शांत केले. पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित पत्नीने केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

SCROLL FOR NEXT