आधी विहिरीत ढकललं, मग डोक्यात दगड घातला! मोबाइलसाठी भाऊच भावाच्या जीवावर उठला माधव सावरगावे
महाराष्ट्र

आधी विहिरीत ढकललं, मग डोक्यात दगड घातला! मोबाइलसाठी भाऊच भावाच्या जीवावर उठला

वाळूज पोलिसांनी त्या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद : आजोबांनी आतेभावाला नवीन मोबाईल खरेदी करून दिला. मात्र, मला दिला नाही याचा राग धरून एका १७ वर्षीय तरुणाने आपल्या आतेभावाचा खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडली आहे. वाळूज पोलिसांनी त्या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

हे देखील पहा-

औरंगाबाद शहराजवळील वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन डिसेंबर रोजी १७ वर्षीय अंकुश प्रल्हाद म्हैसमाळे हा बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी दिली होती. दोन दिवसानंतर पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढोरकीन-बालानगर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय तरुणाची ओळख पटली.

मृतदेह पाहिल्यानंतर त्याचा खून झाल्याचा पोलिसांना संशय पोलिसांना आला. पोलिसांच्या तपासात धक्कादायक कारण समोर आलं. आजोबांनी आते भावाला फोन दिला, मात्र मला का दिला नाही याचा राग धरुन १७ वर्षीय अल्पवयीन मामेभावाने त्याचा खून केल्याचं समोर आलं. त्यासाठी आरोपी अल्पवयीन तरुणाने आपल्या आते भावाला जेवणाचे आमंत्रण दिलं. त्याला वाळूजवरून बिडकीनला घेऊन गेला. तिथं बिर्याणी आणि दारू घेतली. त्यानंतर दोघे विहिरीवरजाऊन बिर्याणी खाली दारू पिले.

त्यानंतर, मामे भावाने आतेभावाला तुझा फोन खूप चांगला आहे माझा फोटो काढशील का अशी विनंती केली. आपला फोटो काढल्यानंतर त्याचाही फोटो विहिरीवर काढतो असं सांगत त्याचा फोन हातात घेऊन त्याला विहिरीवर उभं केले आणि ढकलून दिले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर आपला आते भाऊ विहिरीतील दोराला धरून उभा आहे, हे लक्षात आल्यानंतर विहिरीच्या बाजूला असलेले दोन दगड उचलून त्याच्या डोक्यात घातले आणि खून केला. या घटनेनंतर कुटुंबीय हादरून गेले. केवळ एका मोबाईल वरून तरुणाने आपल्या ते भावाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : "आमची फसवणूक होतेय हे कळतंय" मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, पहा Video

Maharashtra News Live Update: ३ दिवसांचा मुंबईत रिक्षा चालकाचा संप

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर

Actress Murder: अभिनेत्रीच्या हत्येचे रहस्य उलगडले; पतीने रचलेला 'हा' कट पाहून पोलीसही चक्रावले

Sanjay Raut : "...तर मी राजकारण सोडणार" संजय राऊतांचं सरकारला आव्हान, पहा Video

SCROLL FOR NEXT