Nanded Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nanded: नांदेडमध्ये गोळीबाराचा थरार, पंजाबचा यात्रेकरू अन् स्थानिकांमध्ये राडा; एक गंभीर जखमी; थरारक VIDEO समोर

Nanded Crime: नांदेडमध्ये पंजाबचा यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान यात्रेकरूने गोळीबार गेला. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Priya More

Summary -

  • नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना

  • पंजाबच्या यात्रेकरू आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये वादातून हाणामारी

  • गोळीबारात एक स्थानिक व्यापारी गंभीर जखमी

  • संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमधून गोळीबाराची घटना समोर आली आहे. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी आलेल्या पंजाबमधील यात्रेकरू आणि स्थानिकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेदरम्यान यात्रेकरूने गोळीबार गेला. या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाला. हा गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. नांदेड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील यात्री निवास येथे दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान गोळीबार करण्यात आला. पंजाब येथील यात्रेकरू आणि स्थानिक चालक आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. शाब्दिक वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. यावेळी पंजाब येथील यात्रेकरूने गोळीबार केला. या गोळीबारात स्थानिक व्यापारी कमलप्रीत सिंघ सिद्धू याच्या पायाला गोळी लागली.

जखमी झालेल्या व्यापाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी पंजाब येथिल यात्रेकरूसोबत बिदर येथे स्थानिक कार चालकाचा वाद झाला होता. काल सायंकाळी पुन्हा त्याच कारणाने वाद झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणी दोन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साडी विक्रीची जाहिरात, महिलांची चेंगराचेंगरी, 5000 ची साडी फक्त 599 रुपयांत

डोनाल्ड ट्रम्पच्या निशाण्यावर भारत?व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर भारताला धमकी

Panchratna pickle: घरच्या घरी कसं बनवाल चटपटीत पंचरत्न लोणचं?

Maharashtra Live News Update : महापालिका प्रचाराला वेग, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

EPF Withdrawal: कोणत्या कारणांसाठी आणि किती PF काढू शकतात? प्रत्येक कर्मचाऱ्याला हे नियम माहित असायलाच हवेत

SCROLL FOR NEXT