fire broke in jewellery shop near nagpur Saam Digital
महाराष्ट्र

Nagpur Fire News : नागपुरात ज्वेलर्सच्या दुकानाला आग, फर्निचर जळून खाक

Nagpur Latest Marathi News : या घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 3 बंब घटनास्थळी रवाना झाले. काही वेळेतच जवानांना आग विझविण्यात यश आले.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur :

नागपूर शहारतील इतवारी भागात सराफ ओळ मधील पारस उद्योग जवळ असलेल्या वी. के. ज्वेलर्सच्या दुकानाला आज (शनिवार) आग लागली. यामुळे सराफ ओळमध्ये काही काळ खळबळ माजली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वी. के. ज्वेलर्सच्या दुकानाला आग लागल्यानंतर धूराचे लाेट परिसरात पसरले. काही जणांनी अग्निशमन विभागाला आगीची कल्पना दिली. अग्निशमनचा बंब तात्काळ सराफ ओळकडे रवाना झाला. परंतु आगीने राैद्र रुप धारण केले हाेते. (Maharashtra News)

या आगीत दुकानाच्या आतील फर्निचर जळून खाक झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 3 बंबाच्या सहाय्याने जवानांना आग विझविण्यात यश आले. ही आग लागण्याच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fat Loss Tips: कमी खाऊनही वजन वाढतंय? पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करा 'या' सोप्या ५ गोष्टी

Saree Draping Tips for Women: साडी नेसताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात 5 महत्त्वाच्या टिप्स

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवात कल्याण-डोंबिवलीतील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; वाढीव टँकरची व्यवस्था

Manoj Jarange : जरांगेंना मुंबईत येण्याआधीच अटक करा, हाकेंचा'सलाईन'वरून केला खळबळजनक संशय

Jio चा भन्नाट प्लॅन! ₹55 मध्ये 1000 पेक्षा जास्त Live TV Channels आणि बरच काही

SCROLL FOR NEXT