Sakshi Sunil Jadhav
रिलायन्स जिओ नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी विविध प्लान आणत असतं. आता रिलायन्स जिओने फक्त ५५ रुपयांत ३० दिवसांसाठी JioTV Pro Pack उपलब्ध करून दिला आहे.
तुम्ही या पॅकमध्ये यूजर्सना १००० पेक्षा जास्त Live TV Channels पाहण्याची सुविधा मिळते.
Star Plus HD, Colors HD, Sony Entertainment Television HD, Sony SAB HD यांसारख्या लोकप्रिय चॅनेल्सचा समावेश आहे.
Entertainment, Movies, News, Kids, Lifestyle आणि Regional अशा विविध कॅटेगरीमधले चॅनेल्स पाहता येतात.
हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड,मल्याळम, बंगाली, गुजराती यांसह १६ पेक्षा जास्त भाषांमध्ये कंटेट उपलब्ध आहे.
रिचार्ज केल्यानंतर JioTV अॅपमध्ये लॉग-इन करताच प्रिमियम चॅनेल्सचा अॅक्सेस मिळतो.
Android आणि iPhone यूजर्स JioTV अॅप डाउनलोड करून आपल्या Jio नंबरने OTPच्या माध्यमातून लॉग-इन करू शकतात.
₹५५ चा हा पॅक केवळ Entertainment साठी असून यात Calling, SMS किंवा Data Benefits समाविष्ट नाहीत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.