Apple vs Banana: केळी की सफरचंद? फायबरसाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर

Sakshi Sunil Jadhav

फायबर कशात जास्त?

एका सफरचंदात ४ ग्रॅम फायबर असतं, तर केळ्यामध्ये ३ ग्रॅम फायबर असतं.

apple vs banana | pintrest

प्रीबायोटिक पेक्टिन

सफरचंदातले पेक्टिन हे प्रीबायोटिक घटक असतात, त्याने आतड्यामधला फायदेशीर बॅक्टेरिया वाढायला मदत होते.

apple vs banana

केळ्यात इन्युलिन आणि रेसिस्टंट स्टार्च

केळ्यामध्ये हे घटक आढळतात आणि ते आतड्यांमधला चांगल्या बॅक्टेरियांसाठी फायदेशीर ठरतात.

fiber rich fruits

पोटॅशियमसाठी केळी फायदेशीर

सफरचंदाच्या तुलनेत केळ्यामध्ये पोटॅशियम जास्त असल्याने या खनिजाची गरज असणाऱ्यांसाठी ते चांगला पर्याय ठरू शकतं.

banana fiber

पचनाच्या समस्या

तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर सफरचंदापेक्षा केळी जास्त सोयीची वाटू शकतात.

dietary fiber

केळी कशी निवडावी?

कमी पिकलेल्या हिरव्या केळ्यांमध्ये इन्सुलिन आणि रेसिस्टंट स्टार्चचे प्रमाण तुलनेने जास्त असू शकतं.

inulin in banana

व्यायामाआधी केळी फायदेशीर

केळ्यांमध्ये सफरचंदापेक्षा थोडी जास्त ऊर्जा असल्याने व्यायामाआधी खाण्यासाठी ते लोकप्रिय पर्याय आहे.

potassium rich fruit

कोणतं फळ चांगलं?

फायबरसाठी सफरचंद आघाडीवर असलं तरी पोटॅशियम, व्यायाम किंवा वैयक्तिक आरोग्याच्या गरजेनुसार केळीही उत्तम पर्याय ठरू शकते.

nutrition comparison

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

fruit nutrition

NEXT : सावधान! अचानक अंग थंड पडतंय अन् घाम येतोय? 'हार्ट अटॅक' येण्याआधी शरीर देतं हे ७ संकेत; वेळीच व्हा सावध

silent heart attack | meta ai
येथे क्लिक करा