Financial aid to social organizations by saving money from daughter's marriage In Aurangabad
Financial aid to social organizations by saving money from daughter's marriage In Aurangabad डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

कौतुकास्पद! मुलीच्या लग्नातला खर्च वाचवत सामाजिक संस्थांना मदत; समाजापुढे नवा आदर्श

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: लग्न म्हटलं की डीजे, फटाके, फेटे आणि अमाप खर्च. त्यात जर मुलीचं लग्न असेल तर वडील आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात खर्च करायला जराही मागे-पुढे पाहात नाही. लेकीचं लग्न थाटामाटात व्हावं असं प्रत्येक पित्याला वाटत असतं. औरंगाबादमधील (Aurangabad) एका पित्याने आपल्या लेकीचं (Daughter) लग्नही असंच थाटामाटात केलं. मात्र त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात डीजे, फटाके, फेटे यांसारख्या खर्चाला फाटा देत मुलीचं लग्न (Marriage)लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र होतेय. कारण वायफळ खर्च न करता त्यांनी लग्नातूनच सामाजिक कार्य केलं आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेले सुहास तेंडुलकर (Suhas Tendulkar) यांनी आपल्या मुलीच्या विवाहातील डीजे, फटाके, फेटे यांचा खर्च वाचवून ते पैसे सामाजिक संस्थांना आर्थिक मदत म्हणून मोठ्या मनाने दान केले आहेत. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Financial aid to social organizations by saving money from daughter's marriage; A new ideal for society)

हे देखील पाहा -

सामाजिक कार्यकर्ते आणि दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारे सुहास तेंडुलकर यांनी पाच सामाजिक संस्थांना प्रत्येकी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. इतकंच नाही तर अक्षतासाठी ज्वारी आणि तांदळाचा वापर न करता फुलांचा वापर करण्यात आला. त्यातून वाचलेले ३० किलो तांदूळ आणि सोबतच ३० किलो डाळ औरंगाबादेतील ताईज किचनला देण्यात आली.

गरजू व्यक्तींना अवघ्या दहा रुपयांत पौष्टिक जेवण देणाऱ्या ताईज किचनच्या गौरी निरंतर, अनाथ आणि उपेक्षित, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांचे संगोपन, शिक्षण, पुनर्वसन करणाऱ्या शांतिवनचे संचालक दीपक नागरगोजे, वंचित, उपेक्षित, अनाथ, भीक मागणाऱ्या मुलांचे संगोपन करणाऱ्या सेवाश्रमचे संचालक सुरेश राजहंस, मयूरी राजहंस, एचआयव्ही बाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या आनंदग्रामचे दत्ता बारगजे, संध्या बारगजे आणि अनाथ मुलांचे शिक्षण, संगोपन व पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या सहारा बालग्राम संस्थेचे संचालक संतोष गर्जे, प्रीती गर्जे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी २१ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप विवाह सोहळ्यातच केले गेले. त्यामुळे सुहास तेंडूलकर यांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Man Killed girlfriend : प्रेमाचा भयंकर शेवट! मनालीला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबला

Today's Marathi News Live :झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोर्टाचा दिलासा नाहीच

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT