उल्हासनगर मध्ये फिल्मी स्टाईल दरोडा  अजय दुधाणे
महाराष्ट्र

उल्हासनगर मध्ये फिल्मी स्टाईल दरोडा

उल्हासनगर मधील मुथ्थूट फायनान्सवरील फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला आहे.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर Ulhasnagar मधील मुथ्थूट फायनान्सवरील फिल्मी स्टाईल Film style दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला आहे. गॅस कटरने भिंतीला भगदाड पाडून, दरोडेखोर आत शिरण्यापूर्वीच पोलिसांनी Police तातडीने धाव घेतली आहे. दरोडे खोरांना शस्त्रांसह अटक केल्याने, या दरोड्याचा डाव उधळला गेला आहे. Film style robbery in Ulhasnagar

उल्हासनगर रेल्वे स्टेशन Railway station रोडवरील 'न्यू शिवम् अपार्टमेंट'मध्ये तळमजल्यावर 'मुथ्थूट फायनान्स' चे कार्यालय आहे. २३ जून दिवशी कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेले, दुकान काही जणांनी भाड्याने घेतले होते. त्यात फळांचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या बाबत कोणालाही शंका आली नाही. मात्र, शनिवारी रात्री ११ सुमारास फळांच्या दुकानात गॅस Gas कटर, गॅस सिलिंडर आदी वस्तू नेण्यात आल्या.

हे देखील पहा-

फळांच्या fruit दुकानात या साहित्याची गरज काय? कुछ तो गडबड है..असे म्हणत, एका खबऱ्याने विठ्ठलवाडी Vitthalwadi ठाण्याचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांना ही माहिती दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अटक Arrested केलेले सर्व दरोडेखोर उत्तर प्रदेश Uttar Pradesh, झारखंड, नेपाळ Nepal मधील आहेत. त्यांच्या अटकेमुळे आणखी गुन्ह्यांची उकल होणार आहे. Film style robbery in Ulhasnagar

पिस्तूल, तलवार आणि दरोडेखोरांनी गॅस कटर, गॅस सिलिंडर, पाना, हातोडा, स्क्रू ड्रायव्हर या साहित्याच्या आधारे भिंतीला भगदाड पाडण्याचे काम सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी रंगेहाथ ७ जणांना अटक केली. अहमद, इमामउद्दिन खान, रिजाउल शेख, रामासिंग, काळू शेख, तपन मंडळ आणि आजीम शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवार जप्त करण्यात आली आहे. ३ दिवसांपूर्वीच त्यांनी हा प्लॅन रचला होता,अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.आरोपीना न्यायालयात court हजर केले असता, 3 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT