वर्धा : लहान मुले हे देवघरची फुले Flowers अशी म्हण आहे. आई वडिलांसाठी मुल त्यांचे सर्वस्व मानले जाते. वर्ध्यात घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. वर्ध्या Wardha मधील एका वडिलांनी व आईने मिळून चिमुकल्यांना मारहाण केली आहे. Filed complaint against the parents who beat up kids
वर्धा जिल्ह्यात घडलेल्या या मन सुन्न करणारी या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ पसरली आहे. चाईल्ड लाईन Child line व महिला आणि बालकल्याण विभागाच्या प्रयत्नानंतर या चिमुकल्यांच्या आई- वडिलांना पोलिसांनी Police गुन्हा दाखल करून अटक Arrested करण्यात आली आहे. साधारणतः २ दिवसांपूर्वी चाईल्ड लाईनच्या १०९७ या हेल्पलाईनवर २ लहान बहिण- भावांचा वडील व सावत्र आई यांच्याकडून छळ होत असल्याची तक्रार मिळाली होती.
हे देखील पहा-
यावरून चाईल्ड लाईनच्या चमून आर्वी यांनी वर्धा तालुक्यामधील गाव गाठले. यानंतर आर्वी यांनी चिमुकल्यांची वडिल व सावत्र आईच्या ताब्यातून सोडवणूक करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आई- वडिलां कडून सतत मारहाण होत असलेल्या, चिमुकल्यांमध्ये एका ८ वर्षीय व ११ वर्षीय बहिण- भावंडांचा समावेश आहे. Filed complaint against the parents who beat up kids
दरम्यान, या मुलांच्या आई- वडिलांकडून करण्यात येणारा छळ हा अमानवी आणि संताप आणणारा आहे. आपल्या आजूबाजूलाअनेक गोष्टी घडत असतात. परंतु, अशावेळी लहान मुलांचा छळ होत असल्याचे, दिसून येते. पण त्यावेळीच अशा गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे. मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
काही महिन्यांन पासून या मुलांना सातत्याने मारहाण सुरु होती. मुलांच्या शरीरावरील जखमा त्यांच्यावर सावत्र आई व वडिलांकडून करण्यात येत, मारहाणीची अमानुष कहाणी सांगतात. हा प्रकार मारहाणी पुरता थांबला नव्हता, तर चिमुकल्यांना जंगलात सोडण्याचा निर्दयीपणा या सावत्र आई व वडिलांनी केला आहे. या दोन्ही बहिण- भावंडांना अनेकदा उपाशी ठेवलं जात असत. वर्ध्यातील पुलगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल, करून मुलांचे वडील व सावत्र आईला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.