Nupur Sharma  Saam TV
महाराष्ट्र

'नुपूर शर्मा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, अन्यथा देशभर रस्त्यावर उतरु'

नुपूर शर्मा यांच्या विरोधात पॅंथर सेना आक्रमक झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बुलढाणा : भाजपने निलंबित केलेल्या राष्ट्रीय प्रवक्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या (Umesh kolhe Death) करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या काही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, अमरावतीच्या घटनेचा निषेध सर्वच स्तरातून होत आहे. तर दुसरीकडे नुपूर शर्मा यांच्या विरोधात पॅंथर सेना (Panther Sena) आक्रमक झाली आहे. नुपूर शर्मा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, अन्यथा देशभर रस्त्यावर उतरु, असा इशारा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदारे (Deepak Kedare) यांनी बुलढाणा येथे दिला आहे. केदारे बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नुपूर शर्मा प्रकरणात उदयपूर मध्ये कन्हईलालच्या हत्येच्या घटनेचा निषेध झाला. त्यानंतर संबंधीत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. अशाच प्रकारचे सर्व गुन्हे नुपूर शर्मा यांच्यावर दाखल करण्यात यावे. नुपूर शर्मा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा देशभर रस्त्यावर उतरू, असा इशारा दीपक केदारे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

दरम्यान, नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ व्हाट्स अॅपवर स्टेट्स ठेवल्याने अकोल्यातील एका व्यावसायिकाला मारहाण व धमकी देण्यात आल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) केला आहे. आज निवासी उपजिल्हाधिकऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून हे आरोप करण्यात आले. याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत करण्यात यावा, अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT