राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले 'हे' निर्देश

महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest Newssaam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्राला मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपले असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. रत्नागिरीत जोरदार पाऊस पडल्याने खेड येथील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीने (Jagbudi river Flood) धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेडच्या बाजारपेठेत पाणी शिरले असून राजापूरलाही (Rajapur) पुराच्या पाण्याचा वेढा निर्माण झाला आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा,सावित्री, पाताळगंगा,उल्हास व गाढी या नद्यांनाही पूर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारी घेण्यासाठी निर्देश दिले आहेत.

Eknath Shinde Latest News
राज्यात पावसाचा तडाखा, सिंधुदुर्गचा वैभववाडी रेल्वे स्थानक परिसर जलमय

नदीकाठच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सतर्क करणे, पूरसदृष्य परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे, कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे, अशा प्रकारच्या सूचना शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्राला मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपले असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे.

Eknath Shinde Latest News
कोकणात धुवांधार पाऊस; नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

रत्नागिरीत जोरदार पाऊस पडल्याने खेड येथील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीने (Jagbudi river Flood) धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेडच्या बाजारपेठेत पाणी शिरले असून राजापूरलाही (Rajapur) पुराच्या पाण्याचा वेढा निर्माण झाला आहे. तसेच अन्य नद्याही धोक्याच्या इशारा पातळीच्या जवळ आहेत. दरम्यान, जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही 8 मीटर आहे. काजळी नदी 16.910 ंमीटर तर कोदवली नदीची पातळी 5.40 मीटर इतकी आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com