रत्नागिरी : रत्नागिरीत पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने (Rain) रत्नागिरीला अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकणात (Konkan) मुसळधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. चिपळूण, खेडमध्ये नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या धुवांधार पावसामुळे 'एनडीआरएफ'च्या तुकड्या कोकणात रवाना झाल्या आहेत. 'एनडीआरएफ'च्या तुकड्या या चिपळूण,महाडला रवाना झाल्या आहेत. ( Konkan Rain Update News In Marathi )
रत्नागिरीत देखील पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळं चिपळूनमध्ये रस्त्यात जागोजागी पाणी साचले आहे. पावासामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले आहेत. चिपळून डिबीजे कॉलेजसमोर पाणी जमा झाले आहेत. तर महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे नदीचं स्वरुप आलं आहे. चिपळूनमध्ये अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे. अरुंद नाल्यामुळे हे पाणी साचलं आहे. त्यामुळे सदर पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचारी दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरी, खेडमध्ये नद्यांनी पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे 'एनडीआरएफ'च्या तुकड्या कोकणात रवाना झाल्या आहेत. एक तुकडी चिपळूण तर दुसरी महाडला पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढलय.अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलं आहे. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्याची तारांबळ उडाली आहे. अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर जवाहर चौकात पाणी शिरलेय तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी शिरलं आहे. कोदावली आणि अर्जुना नदीनं पात्र सोडल्यानं पुरजण्य परिस्थिती निर्माण झाली आहे.राजापूरला पुरानं वेढलं आहे.
रत्नागिरीत पडणा-या मुसळधारा पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. खेडच्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. तर लांज्यातील काजळी आणि राजापूरमधील कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही 8 मीटर आहे. तर काजळी नदी 16.910 ंमीटर तर कोदवली नदीची पातळी 5.40 मीटर इतकी आहे. खेडमध्ये बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. तर राजापूरमध्ये पुराचा वेढा निर्माण झाला आहे. तर अन्य नद्या या इशारा पातळीच्या जवळ आहेत. त्यामुळे पावसाची संततधार अशीच सुरु राहिली, तर नद्या इशारा पातळी ओलांडू शकतात. त्यामुळे नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.