मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन-चार तासात मुसळधार पावासाची शक्यता

राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत काल पासून पावसाची संततधार सुरू आहे.
Rain update
Rain update saam tv

भूषण शिंदे

मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. मुंबईत काल पासून पावसाची संततधार सुरू आहे. तर आजच्या पावासाने नवी मुंबईला झोडपून काढलं आहे. अशात मुंबई हवामान खात्याने मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तास मुंबईपरिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ( Mumbai Rain Uptate )

Rain update
Ajit Pawar: अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

दोन दिवसांपूर्वी मुंबईत पावसाने दडी मारली होती. मात्र, त्यानंतर कालपासून मुंबईत पावासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेला मुंबईकर सुखावला आहे. त्यात मुंबईत हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांनंतर नवी मुंबईत चांगलाच धोर धरला आहे. नवी मुंबईत गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने देखील सांगितले. नवी मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.

Rain update
मेंढ्यांना धुवायला गेले अन् काळाने घातला घाला, दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

नवी मुंबईसह रत्नागिरीत देखील पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळं चिपळूनमध्ये रस्त्यात जागोजागी पाणी साचले आहे. पावासामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले आहेत. चिपळून डिबीजे कॉलेजसमोर पाणी जमा झाले आहेत. तर महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे नदीचं स्वरुप आलं आहे. चिपळूनमध्ये अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे. अरुंद नाल्यामुळे हे पाणी साचलं आहे. त्यामुळे सदर पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचारी दाखल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com