Ajit Pawar: अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना राज्याच्या विधानसभेच्या पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
Ajit Pawar Latest Marathi News, Maharashtra Assembly Session News
Ajit Pawar Latest Marathi News, Maharashtra Assembly Session NewsSaam Tv

रश्मी पुराणिक -

मुंबई : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.(Ajit Pawar Latest Marathi News)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. आता याच विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे.(Maharashtra Assembly Session News)

पाहा व्हिडीओ -

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधासभेत भाषण झालं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर अजित पवार यांच्या नावाला विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांना राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कौतुक केलं. ते म्हणाले, 'अजित पवारांचे मनापासून अभिनंदन करतो. अजितदादांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अशी अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत. २१ व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या राहण्यातील स्वच्छता टापटीपपणामुळे तसंच तरुणांच्या उमेदीने लोकांमध्ये वावरताना दिसतात.

ते हजरजबाबी आणि रोखठोक स्वभावामुळे ते प्रसिद्ध आहेत. तसंच अजित दादांकडे बैठक असेल तर मी देखील वेळेवर जातो. जमणार नसेल तर नाही म्हणून सांगतो. ते शिस्तप्रिय आहेत. त्यांना शेतीची उत्तम जाण आहे, मतदार संघामध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यांच मताधिक्य वाढत आहे. त्यांची लोकप्रियता देखील वाढते आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे अभिनंदन केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com