File a case against Indurikar Maharaj immediately Aurangabad bench order to police Saam TV
महाराष्ट्र

Indurikar Maharaj News: कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे पोलिसांना आदेश

डॉ. माधव सावरगावे

Indurikar Maharaj Latest News: कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत. 'सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केलं होतं.

त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर (Indurikar Maharaj) महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.

दरम्यान, या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असून खंडपीठाने (Aurangabad bench) इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी अहमदनगर (Ahmadnagar News) येथील आपल्या कीर्तनातील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलं होतं. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी केलं होतं. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

इंदुरीकरांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले होते.'आमचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा' अशी मोहीमच सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर समर्थकांनी इंदुरीकर महाराजांसाठी आंदोलन, मोर्चे काढण्याची तयारी सुद्धा दाखवली होती.

मात्र, इंदुरीकरांनी त्यांना आंदोलनं आणि मोर्चे काढण्यापासून रोखलं. पुढे अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने (Ahmadnagar Court) त्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर महाराजांविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT