Satara, phaltan Saam Tv
महाराष्ट्र

Satara : मिरेवाडीत राडा, दुचाकी, ट्रॅक्टरसह घर - गोठा दिला पेटवून; 42 जणांवर गुन्हा, आठ अटकेत

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओंकार कदम

Satara : जमिनीच्या वादातून थेट घर आणि ट्रॅक्टर पेटवल्याचा प्रकार फलटण (phaltan) तालुक्यातील मिरेवाडी गावात घडला आहे. रस्त्यावरून धुमाळ आणि रुपनवर कुटुंबात वाद झाला. (satara latest breaking news)

हा वाद तहसीलदारांपुढे गेला. त्यावर तोडगा काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा दोन्ही गटात वाद झाला. त्यानंतर रुपनवर यांनी धुमाळ यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली तसेच ट्रॅक्टर आणि ट्रॉली देखील पेटवून देण्यात आली. (Breaking Marathi News)

ज्यावेळी सकाळी भांडणे झाली. त्यावेळी धुमाळ कुटुंबीय लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यावेळी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा धुमाळ कुटुंबीयांना मारहाण झाली.

42 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात दोन्ही गटातील एकूण 42 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील आठ जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तर 10 जण जखमी आहेत. या घटनेत रुपनवर कुटुंबीयांनी देखील पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. नवीन घराचे बांधकाम 20 जणांच्या जमावाने हाताने पाडून कुटुंबीयांना काठ्यानी मारहाण केल्याचे म्हणले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

SCROLL FOR NEXT