Crime News Saam tv
महाराष्ट्र

हॉटेलमध्ये बसून जेवण देण्यास नकार; ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा

कल्याणमध्ये परस्परांविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

साम टिव्ही ब्युरो

कल्याण : कल्याण पश्चिमेला रात्री हॉटेल बंद असताना एका हॉटेलमध्ये बसून जेवण करु देत नाही, याचा राग आल्याने ग्राहकाने हॉटेलच्या वाचमनवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त हॉटेल कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला बेदम मारहाण केली आहे. या मारामारीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडाच्या पोलिसांनी (Police) परस्परां विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, कल्याण पश्चिमेत नामांकीत पॅराडाईज हॉटेल आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास हे हॉटेल बंद झाले असताना त्या ठिकाणी शार्दुल काळे व मयूर बर्गे नामक दोन व्यक्ती हॉटेलमध्ये जेवणासाठी आले. मात्र हॉटेलच्या बाहेर उभा असलेल्या महेश गुप्त नावाच्या वॉचमेन व इतर कर्मचाऱ्यांनी हॉटेल बंद आहे. फक्त पार्सल मिळेल बसून जेवता येणार नाही असे सांगितले. यानंतर संतप्त झालेल्या शार्दुल काळे व मयूर बर्गे या दोन्ही ग्राहकांनी वॉचमनला बेदम मारहाण करत वाचमनवर चाकूने हल्ला केला.

रक्तबंबाळ वॉचमनला पाहून टेलमधील वेटर व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून या दोन्ही ग्राहकांना बेदम मारहाण केली. या घटनेत ग्राहक व वॉचमन दोन्ही गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू केला आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

SCROLL FOR NEXT