शिवसेना वाढवण्यात उद्धव ठाकरेंचं काय योगदान?; नितेश राणेंचा सवाल

मुंबईची अवस्था २५ -३० वर्ष शिवसेनेनं काय केली हे समजावे म्हणून ही पोलखोल सभा आयोजित करण्यात आल्याचे राणे म्हणाले.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam Tv
Published On

मुंबई: आज मुंबईत भाजपतर्फे (BJP)पोल खोल मेळावा वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेत बोलताना आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेना (Shivsena) वाढवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे, असा सवाल राणे यांनी केला. मुंबईची अवस्था २५ -३० वर्ष शिवसेनेनं काय केली हे समजावे म्हणून ही पोलखोल सभा आयोजित करण्यात आल्याचे राणे (Nitesh Rane) म्हणाले.

Nitesh Rane
शरद पवारांकडून 'ते' दूषित वातावरण निवळण्याचा प्रयत्न; पुण्यात उद्या ब्राह्मण संघटनांची बैठक

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, हाजी भाईंनी एवढे बॅनर लावले म्हणून शिवसेनेने (Shivsena) पोलिसांना त्रास द्यायला सुरुवात केली. हाजींना मी सांगतोय चार पाच बाहेर बॅनर कमी करा, आणि मातोश्रीबाहेर एलईडी लावा जेणेकरून मुख्यमंत्री आमचे भाषण ऐकतील, असंही नितेश राणे म्हणाले. गेली अडीच वर्ष हे सरकार आहे ते लोकांसाठी चाललेलं नाही. ही फक्त ठाकरे सरकार नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू आहे. किती येतात आणि कोण काय घेऊन येतो यावर हे सरकार अवलंबून आहे, असंही राणे (Nitesh Rane) म्हणाले.

ठाकरे सरकार लोकांना लुटत आहे. बाकी काहीच सुरू नाही. आपल्या राज्याला परिवहन मंत्री आहे का?, ते अनिल परब मातोश्रीचे परिवार मंत्री आहे, असा टोलाही राणे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना राणे म्हणाले, आता धर्मवीर नावाचा सिनेमा पहा कारण त्यात तुम्हाला कळेल, शिवसेना घडवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान होते ते, शेवटी कसे येतात पाहा. या सिनेमात राज ठाकरे आणि राणे साहेब येतात त्यांच्या मागे ते कसे येतात पाहा. उद्धव ठाकरे या सिनेमाचा शेवट न बघता निघून गेले. राणे साहेब आणि राज ठाकरे स्वतःच्या भावाला स्क्रिनवर बघावे लागू नये म्हणून ते निघून गेले, असा टोलाही राणे (Nitesh Rane) यांनी लगावला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com