शरद पवारांकडून 'ते' दूषित वातावरण निवळण्याचा प्रयत्न; पुण्यात उद्या ब्राह्मण संघटनांची बैठक

शरद पवारांनी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करून राज्यातील २० ते २२ संघटनांना पुण्यात चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
Published On

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यात भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कवी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली होती. पवारांनी त्यांची कविता वाचून दाखवल्यानं अनेक ब्राह्मण संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या कवितेच्या माध्यमातून पवारांनी हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याची टीका भाजप (BJP) आणि ब्राह्मण संघटनांनी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ब्राह्मण समाजविरोधी विधान केलं होतं. मिटकरी यांचं ब्राह्मण समाजविरोधी विधान आणि पवारांचे कविता वाचन यामुळं राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं होतं. त्यानंतर झालेल्या टीका-टिपण्णीनंतर ते दुषित वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) निवळण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी स्वत: शरद पवारांनी बैठक आयोजित करून राज्यातील २० ते २२ संघटनांना पुण्यात चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र, काही ब्राह्मण संघटनांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. (NCP Chief Sharad Pawar Organized brahman organization meeting in pune )

हे देखील पाहा -

साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कविता भरसभेत वाचून दाखवली होती. त्यानंतर शरद पवारांवर भाजपसहित अनेक ब्राह्मण संघटनांनी टीका केली होती. आमदार अमोल मिटकरी यांनीही काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजविरोधी विधान केलं होतं. या साऱ्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं होतं. सोशल मीडियावरही त्या कवितेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार टीकेचे धनी ठरले होते. ते सारे दूषित वातावरण निवळण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी शरद पवारांकडून पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात उद्या संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी २० ते २२ संघटनाना पवारांनी निमंत्रण दिलं आहे.

Sharad Pawar
बाळासाहेबांच्या आठवणीने मी भावुक होतो - संजय राऊत

दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे वातावरण चांगलंच दुषित झाले. ते दुषित वातावरण निवळण्याचा पुण्यातील या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. तर काही ब्राह्माण संघटनांनी शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. परशुराम सेवा संघाचा त्यात समावेश आहे. परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे पत्रक काढत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे गेले २० वर्ष ब्राह्मण विरोधी भूमिका हे बहिष्काराचे कारण आहे. काही राजकीय नेते आपल्या आपले लिखाण तसेच वक्तव्यातून द्वेषमुलक वातावरण तयार करीत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ब्राह्मण विरोधी येत असलेल्या भूमिकांमुळे आम्ही हा बहिष्कार घालत आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com