buldhana, chikhli, rahul bondre, shyam wakadkar, social media saam tv
महाराष्ट्र

Social Media : काँग्रेसच्या माजी आमदाराने भाजप कार्यकर्त्याला चाेपले; आज थोडक्यात झाले... यानंतर परिणाम वाईट होतील दिला इशारा

या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय जाधव

Buldhana News : चिखलीत (chikhli) काँग्रेसच्या माजी आमदाराने तुफान राडा घातल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार राहुल बाेंद्रेंसह (rahul bondre) समर्थकांनी भाजपच्या श्याम वाकदकरांना (shyam wakadkar) रस्त्यावरच मारहाण केली. (Breaking Marathi News)

माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वडीलांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वाकदकर यांनी समाज माध्यमातून (social media) केली होती. त्यामुळेच हा प्रकार घडला अशी चर्चा हाेती. दरम्यान स्वतः राहुल बोंद्रे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट खपवून घेतली जाणार नाही, आज थोडक्यात झाले, यानंतर परिणाम वाईट होतील असा इशारा ही माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला. या घटनेनंतर वाकदकर यांना बुलडाणा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेवरुन अद्याप काेणत्याही गटाकडून पाेलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पाेलिसांनी राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयाजवळ बंदोबस्त वाढविला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT