Masala Bhendi Recipe: नेहमीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा गावरान स्टाईल मसाला भेंडी

Siddhi Hande

मसाला भेंडी

नेहमीची भेंडीची खाऊन कंटाळलात तर तुम्ही मसाला भेंडी खाऊ शकतात.

Masala Bhendi Recipe | yandex

मसाला भेंडी

सुकी भेंडीची भाजी लहान मुले खायला कंटाळा करतात. त्यामुळे तुम्ही मसाला टाकून करु शकतात. डब्ब्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

Masala Bhendi Recipe | Social Media

भेंडी धुवून घ्या

सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भेंडी कोरडी करुन घ्या. यानंतर मधून कापून त्याचे लहान तुकडे करा.

Masala Bhendi Recipe

मोहरी

यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग टाका. कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण टाकून परतून घ्या.

Masala Bhendi Recipe | Social Media

टॉमेटो पेस्ट

यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर त्यात टॉमेटोची पेस्ट टाका.

Masala Bhendi Recipe

गरम मसाला

यानंतर हळद, लाल तिखट, धनेफूड टाका. यानंतर गरम मसाला घालून मिक्स करा.

masala | yandex

भेंडीला मसाला लागू द्या

यानंतर त्यात भेंडी टाकून मिक्स करा. भेंडीला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे.

Bhendi Masala Gravy | Social Media

शिजवून घ्या

यानंतर झाकण ठेवून एक १० मिनिटे शिजवून घ्या.

Bhendi Masala Gravy | Social Media

शेंगदाण्याचा कूट

यानंतर भेंडीत शेंगदाण्याचा कूट टाका. त्यात आवश्यकतेनुसार मीठ टाका. त्यावर कोथिंबीर टाकून मिक्स करा.

Next: नाश्त्याला बनवा मराठवाड्याचा चविष्ट पदार्थ 'सुशीला', १० मिनिटांत रेसिपी तयार

Sushila Recipe | yandex
येथे क्लिक करा