Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला घरीच सिंपल पद्धतीने सुशीला हा पदार्थ बनवा. तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. तसेच मुलं आवडीने खातील.
सुशीला हा महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील एक लोकप्रिय नाश्त्याची रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा एक नक्की ट्राय करा.
सुशीला बनवण्यासाठी कुरमुरे, तेल, कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरची, कांदा, हळद , मीठ , पांढरी उडीद डाळ , टोमॅटो आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
सुशीला बनवण्यासाठी सर्वप्रथम कुरमुरे भिजवून घ्या. जास्त पाणी टाकू नका. भाजलेले कुरमुरे वापरू नका.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे घालून तडतडू द्या. यात हिरवी मिरची घालून चांगले परतवून घ्या.
मिश्रण परतून झाल्यावर यात बारीक चिरलेला कांदा, हळद आणि मीठ घालून पुन्हा परतवून घ्या. त्यानंतर यात पांढरी उडीद डाळ आणि टोमॅटो घालून परतवून घ्या.
आता यात वरून भिजवलेले कुरमुरे घाला. याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्याल. सर्व साहित्य मिक्स करून यात कोथिंबीर घाला.
आता एका बाऊलमध्ये सुशीला हा पदार्थ काढून वरून शेव आणि कोथिंबीर घाला. तुम्ही याला फोडणी देखील देऊ शकता.