लसीकरणावरून भाजप- शिवसेना नेत्यां-कार्यकर्त्यांमध्ये राडा माधव सावरगावे
महाराष्ट्र

लसीकरणावरून भाजप- शिवसेना नेत्यां-कार्यकर्त्यांमध्ये राडा

औरंगाबाद शहरातल्या विजयनगरमध्ये कोरोना लसीकरण टोकनवरून सोमवारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यां-कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद Aurangabad शहरातल्या विजयनगरमध्ये कोरोना लसीकरण Corona Vaccination टोकनवरून सोमवारी भाजप BJP आणि शिवसेनेच्या Shivsena नेत्यां-कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. याप्रकरणी माजी उपमहापौर आणि युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळसह शिवसेनेच्या सात कार्यकर्त्यांवर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा-

महानगरपालिकेच्या Municipal Corporation लसीकरण केंद्रावर सोमवारी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते टोकन वाटत होते. त्यावेळी राजेंद्र जंजाळ आणि भाजपचे ओबीसी OBC मोर्चाचे नेते गोविंद केंद्रे यांच्यात वाद झाला. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या कारमधून रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्याची तक्रार भाजपच्या गोविंद केंद्रे यांनी केली होती.

शहरातील विजयनगर लसीकरण केंद्रावर सोमवारी टोकन मिळण्याच्या वादातून भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष गोविंद केंद्रे आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ समर्थकांमध्ये राडा झाला. त्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानं गोविंद केंद्रे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गंभीर जखमी झाले होते.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT