latur Police  Saam tv
महाराष्ट्र

Latur Traffic Police Controversy : झिपरे बोलून कानफटात देणे पडलं महागात; ३ तरुणींची मारकुट्या कॉन्स्टेबलविरोधात पोलिसांत धाव

Latur Traffic police update : झिपरे बोलून कानफटात देणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलविरोधात कारवाई व्हावी, यासाठी तीन तरुणींनी पोलिसांत धाव घेतली आहे.

Vishal Gangurde

संदिप भोसले, साम टीव्ही

latur crime : ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणींना शिवीगाळ करून मारहाण करणे महिला पोलीस कॉन्स्टेबलला चांगलंच महागात पडलं आहे. लातूरच्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात तीन तरुणींनी पोलिसांत धाव घेतली आहे. महिला कॉन्स्टेबलविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी तरुणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आहेत. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर महिला कॉन्स्टेबलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुटीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन मुलींना लातूरमध्ये महिला कॉन्स्टेबलकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यात होती. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र आज या महिला पोलीस कर्मचारीने सगळ्या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली आहे. त्याच मुली आज लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या आहेत.

नियम तोडून वाहन चालवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र मनात राग धरून अश्लील शिवीगाळ करत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल प्रणिती मुसने यांनी मुद्दाम मारहाण केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

महिला पोलिसाने हात जोडून मागितली मााफी

ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तरुणींना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने माफी मागितली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी हात जोडून माफी मागितली आहे. मी भावनेच्या भरात त्यांच्यावर रागावले. त्यांच्यावर एक आई म्हणून संताप व्यक्त केला. मला ड्युटीला जायचं असल्याने वर्दी घातली होती, असेही मुसने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. काही नेटकऱ्यांनी महिला पोलिसावर कारवाईची मागणी केली. तर काहींनी तरुणींना चांगला धडा शिकवल्याचे म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

अरे बापरे! रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ८ फूट लांबीची मगर; पाहताक्षणी नागरिकांचा अडकला श्वास

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

SCROLL FOR NEXT