BEED FDA RAID EXPOSES RONGALITE ADULTERATION IN KHOYA, PANEER AND SWEETS Saam Tv
महाराष्ट्र

Beed : तुम्हीसुद्धा खाताय चकाकणारं पनीर! FDA ने केला भेसळ करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

Beed FDA Raid News : बीड जिल्ह्यातील दहीवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत खवा, पनीर आणि मिठाईमध्ये घातक सॅफोलाईट (रोंगालाईट) रसायनाची भेसळ आढळून आली. हजारो रुपयांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • दहीवंडी येथील मिठाई कारखान्यात खवा, पनीर आणि मिठाईमध्ये सॅफोलाईटची भेसळ

  • अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 35,536 रुपयांचा संशयित साठा जप्त केला

  • जप्त केलेले खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले

  • कारखान्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरातील अनेक भेसळयुक्त पदार्थांना चांगलाच दणका बसला आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुधाचे पदार्थ अधिक चमकदार आणि आकर्षक दिसावेत यासाठी खवा, पनीर आणि मिठाईमध्ये आरोग्यासाठी घातक असलेल्या ‘सॅफोलाईटची भेसळ केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दहीवंडी येथील जय श्री कृष्णा केक ॲन्ड बर्फी या दुकानावर छापा टाकला. तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेत खवा, पनीर आणि इतर दुधाच्या पदार्थांना कृत्रिम चमक आणण्यासाठी सॅफोलाईटचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच कारखान्यातील स्वच्छतेची परिस्थितीही अत्यंत खराब असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाईदरम्यान तब्बल 35 हजार 536 रुपयांचा मिल्क केक, बर्फी आणि अन्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासणीत हा साठा कमी दर्जाचा, असुरक्षित आणि भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

अन्नपदार्थ खाण्यालायक नसल्याने आणि आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा संपूर्ण साठा घटनास्थळीच खोल खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आला.याप्रकरणी कारखान्याचे मालक कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित यांच्याविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

काय आहे सॅफोलाईट?

सॅफोलाईट, ज्याला सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सीलेट (Rongalite) असे म्हणतात, हे प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी असलेले रसायन आहे. कापड आणि वस्त्रोद्योगात रंगकाम, छपाई तसेच अतिरिक्त रंग काढण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, अन्नपदार्थांमध्ये या रसायनाचा वापर पूर्णपणे बेकायदेशीर आणि धोकादायक मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

SCROLL FOR NEXT