tuljapur saam tv
महाराष्ट्र

FDA ची तुळजापुरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई, 9 व्यावसायिकांना शटर डाऊनचा आदेश

या कारवायांमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेता व निर्मात्यांचे धाबे दणाणले आहेत.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सवास ( Tuljapur Shardiya Navratri 2023) माेठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. लाखाे भाविक तुळजापूरात देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांच्या आराेग्याची काळजी घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) सतर्क आहे. एफडीएने मिठाईसह खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानांची तुळजापूरात तपासणी मोहीम सुरु केली आहे. (Maharashtra News)

शारदीय नवरात्रानिमित्त तुळजापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. तुळजापूर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून धडक कारवायांचे सत्र राबवल जात आहे. हॉटेल, स्वीट होम, नमकीन, फराळ, पेढे निर्माते व विक्रेते यांच्या दुकानांच्या तपासण्या सुरु आहेत.

या तपासण्यांनंतर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 9 व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचना केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांनी दिली. तसेच अस्वछ जागी ठेवलेला पेढा नष्ट करून चार नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

आगामी काळात देखील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशाच कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. या कारवायांमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेता व निर्मात्यांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: नांदगावला धुवाधार पाऊस लेंडी नदीला पुर .रेल्वे अंडरपास 3 फूट पाण्याखाली

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

Horoscope Saturday : गोपाळकाला जाणार या 6 राशींसाठी लाभाचा, प्रवासातून होईल फायदा; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT