nashik, fda, khoa saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशकात अकराशे किलो बनावट खवा जप्त, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

यापुर्वी मलई पेढ्यांत मलईच नसल्याचे एफडीने उघडकीस आणले हाेते.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News : अन्न व औषध प्रशासनाकडून नाशिक शहरात हजारो किलो बनावट खवा सदृश्यपदार्थ जप्त करण्यात आला आहे. दुधाविना बनलेला हा खवा (khoa) असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. (Maharashtra News)

गुजरातहून पाम तेल आणि इतर पदार्थांचा बनलेला खवा सदृश्यपदार्थ अन्न औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेला विना दुधाचा बनवलेला हा खवा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

एफडीएने दिलेल्या माहितीनूसार सुमारे अकराशे किलो खवा हा गुजरात येथून नाशिक येथे खासगी बसच्या माध्यमातून हायजिनिक कंडिशनमध्ये आणण्यात आला. दूध न वापरता केमिकल्स आणि ऑइल पासून बनवण्यात येणारा हा खवा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

दरम्यान मध्यंतरी त्रंबकेश्वर येथे असेच विना दुधापासून बनलेले मलईदार पेढे जप्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गुजरातमधून येणारा हा साठा नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने पकडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT