FDA and police officials display the seized banned gutkha and tobacco products during a joint operation at Songir Toll Plaza in Dhule. saam tv
महाराष्ट्र

आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

FDA Action On Banned Gutkha In Dhule: आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीए आणि पोलिसांनी धुळे येथे संयुक्त कारवाई करून २३.५ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि एक वाहतूक वाहन जप्त केले.

Bharat Jadhav

  • आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यात मोठी कारवाई.

  • सोनगीर टोलनाक्यावर FDA आणि पोलिसांची संयुक्त छापेमारी.

  • प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहनासह ₹23.5 लाखांचा मुद्देमाल जप्त.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधात्मक सुगंधित तंबाखू जप्त केली. नागपूर शहरातील बुनकर कॉलोनीमध्ये छापेमारी करून एफडीएच्या पथकाने ४१९ किलोहून अधिक प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केली होती. आता तुकाराम मुंढे यांनी धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. धुळे जिल्ह्यातील कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर टोलनाक्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व मालवाहू वाहन जप्त केले आहे. या कारवाईत तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजस्थानातील चालकाविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोलनाका ही कारवाई करण्यात आली. येथे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी संशयास्पद मालवाहू वाहन (क्र. एचआर-५५ एई-६८२१) थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल पान मसाला व व्ही-१ टोबॅको तंबाखूची वाहतूक होत बाब उघडकीस आली.

१७ लाख ७६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला जप्त

या कारवाईदरम्यान १७ लाख ७६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला, ७४ हजार रुपये किमतीची व्ही-१ टोबॅको तंबाखू तसेच सुमारे ५ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन असे एकूण २३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुरेश कुमार बिरबलराम गुर्जर (वय ३४, रा. धानी नापावली, पोस्ट डुंगा की नागल, ता. का. ठाणा, जि. सीकर, राजस्थान) याच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत भारत राणे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल व त्यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान या कारवाईमुळे प्रतिबंधात्मक वस्तूंची नियमबाह्य विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठवणूक व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT