Akola: धक्कादायक! सावत्र पित्यानेच केले अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तक्रारीवरून गुन्हा दाखल Saam Tv
महाराष्ट्र

Akola: धक्कादायक! सावत्र पित्यानेच केले अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तक्रारीवरून गुन्हा दाखल

अकोल्यातील अकोटमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील (Akola) अकोट (Akot) मध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, मुलीचे अपहरण (Abduction) झाल्याची फिर्याद देणाऱ्या पित्यालाच आता अकोट शहर पोलिसांनी (police) गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला अटक (Arrested) केली आहे. (father who exploited girl absconding)

हे देखील पहा-

अकोल्यातील (Akola) अकोट (Akot) येथील एका सावत्र पित्याने शहर पोलीस स्टेशनमध्ये १६ वर्षीय मुलगी ही घरी कोणालाही न सांगता निघून गेली होती. तिला अज्ञात व्यक्तीने पळविल्याचा आरोप करत १८ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला होता. मुलीचा शोध सुरू असताना, 20 जानेवारी रोजी बेपत्ता मुलगी आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. मुलीला सुरक्षित बघून पोलिसांना दिलासा मिळाला.

मात्र, मुलगी व आईने घडलेल्या घटनेची आपबिती पोलिसांना सांगितली. अपहरणाची तक्रार देणाऱ्या सावत्र पित्याने मुलीला ७ महिन्यांपूर्वी अमरावतीवरून अकोटला घरी आणली होती. या ठिकाणी तो सतत तिच्यावर बळजबरीने बलात्कार करायचा. एकदिवस त्याने मुलीला थंडपेयामधून दारू पाजून लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहली होती.

दरम्यान, तिने अकोट येथून पलायन करून आईकडे जात, सर्व हकिकत तिला सांगितली होती. यामुळे आई व मुलीने अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी (Accused) सावत्र पित्याविरुद्ध भादंवि कलम ३५४,३७६,५०४ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सावत्र पित्याला शहर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT