Father and son contesting against each other from rival Shiv Sena factions during the Mumbai Municipal Corporation elections in Ward 138. Saam Tv
महाराष्ट्र

घरातच राजकारणाची कुस्ती, बापाच्या विरोधात मुलगा मैदानात

Thackeray Sena vs Shinde Sena: राजकारणामुळे रक्ताच्या नात्यातही संघर्ष उडतोय. मनपा निवडणुकीत हे प्रकर्षाने दिसून आलंय. एका प्रभागात मुलाने थेट जन्मदात्या बापाच्या विरोधातच शड्डू ठोकलाय.. मात्र हा प्रकार कुठं घडलाय ? बाप-लेक कोणत्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत ?

Suprim Maskar

महापालिका निवडणुकीत घराघरातच राजकारणाची कुस्ती रंगलीय... मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 138 मध्ये चक्क बाप- लेक एकमेंकासमोर उभे ठाकलेत. त्यातही महादेव अंबेकरांना ठाकरेसेनेकडून उमेदवारी मिळालीय. तर मुलगा डॉ. अमोल अंबेकरांना शिंदेसेनेनं तिकीट दिलयं... त्यामुळे बाप-लेकांची ही लढत कोल्हापुरी मिसळसारखी झणझणीत झालीय...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेसेना आणि शिंदेसेना अनेक ठिकाणी आमनेसामने आल्या. आता महापालिका निवडणुकीत मुंबईतली निवडणूक ठाकरे सेनेसाठी अस्तीत्वाची लढाई आहे. दोन्ही पक्षांनी कंबर कसलेली असताना एकाच कुटुंबात बापाला ठाकरेसेनेनं तर मुलाला शिंदेसेनेनं उमेदवारी दिल्यानं नवा संघर्ष पेटलाय...

राज्याच्या राजकारणात आतापर्यंत काका-पुतण्याची, भावा-बहिणींची, भावा-भावांची लढत अनेकदा दिसलयं...आता बापाविरोधात पोरानं दंड थोपल्यानंतर गोवंडी परिसरातील राजकीय वातावरण चांगलचं तापलयं... डॉ. अमोल अंबेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावल्यानं या निवडणुकीला चांगलीच प्रतिष्ठा मिळालीय... आता बाप-लेकाच्या या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT