chandrapur, Crime News, Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची केली हत्या, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

घरी आल्यानंतर मुलांना पाहून आईला धक्काच बसला, कारण...

साम टिव्ही ब्युरो

चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा शहराजवळ असलेल्या बोर्डा गावात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. संजय कांबळे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना पाजून त्यांची हत्या केलीय. सुमित संजय कांबळे (७) आणि मिस्टी संजय कांबळे (३) अशी मृत पावलेल्या मुलांची नावं आहे. या गंभीर घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. वरोरा पोलीस (Police) या प्रकरणाचा कसून तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. (chandrapur latest news update)

मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे परिवार बोर्डा या गावातील रहिवासी आहेत. संजय श्रीराम कांबळे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होता. कोरोना काळापासून त्याची मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग बंद होते. तर संजय यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी तत्वावर काम करते. संजयने त्यांच्या दोन्ही मुलांना विष देऊन हत्या केली.

त्यानंतर मुलांची आई घरी आल्यानंतर तिला दोन्ही मुलं बेडवर पडून असल्याचे दिसले. ही धक्कादायक घटना पाहताच मुलांच्या आईने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर शेजारील नागरिकांना दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT