Wardha Crime news  Saam TV
महाराष्ट्र

Wardha: जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलांची हत्या; स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

संजय हा खासगी शिकवणी वर्ग चालवीत होता, तर पत्नी प्रेरणा ही शहरातील एका महाविद्यालयात प्रयोगशाळेत नोकरीला आहे.

Jagdish Patil

वर्धा: चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) वरोरा तालुक्यामध्ये जन्मदात्या बापानेच पोटच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन स्वता:ला देखील संपवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय कांबळे असं मुलांची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या वडिलाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे संजय हा खासगी शिकवणी वर्ग चालवीत होता, तर पत्नी प्रेरणा ही शहरातील एका महाविद्यालयात प्रयोगशाळेत नोकरीला आहे. शुक्रवारी मुलगा अस्मित (७) हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजोबा प्रभाकर पेटकर यांच्याकडे गेला होता.

पाहा व्हिडीओ -

संजयने काही कारण सांगून त्याला घरी आणले, तर लहान मुलगी मिस्टी (३) ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना आतमध्ये कोंडून त्यांना प्रथम विष पाजले, तेवढ्यावरही त्याचे समाधान झाले नाही तर त्याने दोन्ही मुलांचा गळा आवळला. दोघांचाही मृत्यू झाल्याच शहानिशा करून बाहेरून दाराल कुलूप लावून संजय तिथून निघून गेला.

सायंकाळी मुलांची आई घरी आली असता तिला आपली दोन्ही मुलं मृतावस्थेत दिसली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासामध्ये वडील संजय कांबळे यानेच आपल्या मुलांची हत्या केल्याचं समोर आलं.

या घटनेनंतर वरोरा पोलिसांनी (Varora Police) फरार असलेल्या आरोपी संजय याच्या शोध घ्यायला सुरुवात केली असता, साखरा गावाजवळील मंगरूळ फाट्यालगत शेतात त्याचा मृतदेह शनिवारी आढळून आला.

त्यामुळे मृतक संजय कांबळे याने आधी पोटच्या मुलांची हत्या केली आणि स्वत: देखील विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. मात्र, त्याने एवढं कठोर आणि टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोप आलेलं नाही. गिरड पोलिसांनी याप्रकरणाची नोंद केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवार गटाच्या आमदारावर हल्ला; तोंडाला रुमाल बांधून आलेल्यांकडून कारवर दगडफेक

Evening Puja Timing: वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी देवपूजा करण्याची वेळ काय?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गमध्ये लपलेला 'हा' समुद्रकिनारा पाहताच मालदीव,थायलंड विसराल

Dombivli : डोंबिवलीत मोठा राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, कारही फोडली; Video

SCROLL FOR NEXT